आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी नदीत बुडून तीन बालकांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
परभणी- गोपेगाव (ता. पाथरी) येथे गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा सोमवारी (दि.आठ) सकाळी नऊच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. रामा ढगे (१०), आदित्य अमृत गिराम ( ११), ऋषिकेश अच्युत गिराम (१२) अशी मृत्यू झालेल्या त्या मुलांची नावे आहेत. 

पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीवर ढालेगाव येथे बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्याचे ‘बॅक वॉटर’ गोपेगाव परिसरापर्यंत आलेले आहे.  बंधाऱ्याचे पाणी गोपेगावपर्यंत असल्याने उन्हाळ्याच्या सुटीत परिसरातील मुले मोठ्या प्रमाणात तेथे पोहण्यासाठी येतात. गावातील महिलादेखील धुणी धुण्यासाठी नदीकाठावर येत असतात.  सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास गावातील रामा ढगे, आदित्य गिराम, ऋषिकेश अच्युत गिराम हे तिघेही नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. पाणी भरपूर असल्याने या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. तिघेही खोल पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच या मुलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्याच वेळी नदीकाठावर कपडे धुणाऱ्या महिलांचे लक्ष या मुलांकडे गेले. त्यांनीही जवळपासच्या ग्रामस्थांना तातडीने कळवले. मात्र ग्रामस्थ नदीकाठावर येईपर्यंत मुले पाण्यात बुडाली होती.   

तब्बल अर्ध्या तासानंतर त्या तिघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थांनी लगोलग या तिघांनाही पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
बातम्या आणखी आहेत...