आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरपणे घरातच केला गर्भपात; पुरावा नष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजाेगाई - घरातच खासगी नर्सच्या साहाय्याने गर्भपात करून गर्भाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला. अत्यंत निर्दयी व क्रूरपणे झालेला हा प्रकार त्या महिलेला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने उघडकीस अाला. या प्रकरणी पती, पत्नीसह गर्भपात करणा-या खासगी नर्सवर गुन्हा दाखल झाला अाहे. शहरातील बानाईनगर परिसरात वैजनाथ अात्माराम पतकराव व त्यांची पत्नी सुनीता वैजनाथ पतकराव हे दांपत्य राहते. त्यांना दाेन मुली अाहेत. सुनीता या तिस-या वेळी गराेदर हाेत्या. हा गर्भ मुलीचा असावा, या विचाराने पती-पत्नीने गर्भपात करण्याचे निश्चित केले. खासगी रुग्णालयातील नर्स धनश्रीला (पूर्ण नाव कळाले नाही)बाेलावण्यात अाले. ३० एप्रिल रोजी रात्री धनश्रीने सुनीता यांना विविध प्रकारची इंजेक्शन्स व गर्भपाताच्या गाेळ्या िदल्या. काही वेळाने गर्भपात झाला. अर्भकाची विल्हेवाट लावून पुरावाही नष्ट केला.
मात्र, सुनीता यांना त्रास हाेऊ लागला. धनश्रीने तातडीने उपचार सुरू केले. मात्र रक्तस्राव वाढल्याने सुनीता यांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. स्त्री राेग व प्रसूती िवभागात उपचार करणा-या डाॅक्टरांच्या निदर्शनास हा प्रकार येताच हे प्रकरण गर्भपाताचे असल्याचे समाेर अाले. त्यामुळे डाॅक्टरांनी पाेलिसांत नांेद (एम.एल.सी.) करण्याचे सांगून उपचार केले. मात्र उपचारादरम्यान सुनीता यांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने त्यांना मुंबई येथे पाठवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...