आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमीचा रुग्णालयात मृत्यू, नातलगांचा गोंधळ, वेळेवर उपचार मिळाले नसल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - अपघातातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारास विलंब केल्याने जखमीचा मृत्यू झाल्याचा अारोप नातेवाइकांनी करत जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला.
बीड शहरात शुक्रवारी झालेल्या अपघातात जब्बार शेख (४०, रा. महंमदिया कॉलनी) हे जखमी झाले. दुपारी दीडच्या दरम्यान त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये दाखल करण्यात केल्यानंतर त्यांना पोटात आणि छातीत त्रास होत असल्याचे त्यांनी परिचारिकेला सांगितले. दीड वाजता कॉल केल्यानंतर अस्थिरोगतज्ज्ञ आणि फिजिशयन चार वाजता रुग्णालयात आले. या दरम्यान जब्बार यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच जब्बार शेख यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. सामाजिक कार्यकर्ते माेईन मास्टर, राष्ट्रवादीचे शफीक शेख, माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल यांनी रुग्णालयात धाव घेत जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांकडे
तक्रार केली आहे.

चौकशी करू
झाल्या प्रकाराबाबत सर्व घटनाक्रमाची चौकशी करण्यात येईल. वैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा शल्यचिकित्सक