आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inspection Team,slow Rain Is Green For Good, Not For Crops

रिमझिम हिरवळीसाठी चांगली, पिकांसाठी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड -बिंदुसरा प्रकल्पाची पाहणी करून मांजरसुंब्याकडे निघालेला अधिकाऱ्यांचा ताफा दोन शेतकऱ्यांनी दुचाकीवरून जाऊन अडवला. ताफा थांबल्यानंतर तीन-चार शेतकऱ्यांनी गाडीच्या दिशेने गर्दी केली. पावसाची रिमझिम हिरवळीसाठी चांगली आहे पण पिकासाठी काहीच कामाची नाही, असे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांसमोर मांडले.
दुष्काळीिस्थती पाहण्यासाठी केंद्रीय दुष्काळ निवारण अायुक्त राघवेंद्र सिंग यांचे एक सदस्यीय पथक गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी, मादळमाेही, कुंभारवाडी येथील पिकांची पाहणी केल्यानंतर बीडच्या शासकीय विश्रामगृहावर अाले. पाऊण तासामध्ये जिल्ह्याचा अाढावा व जेवण करून पथक पाली मार्गे चाैसाळ्याच्या दिशेने दुपारी ३.३४ वाजता रवाना झाले. या पथकामध्ये विभागीय अायुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवल किशाेर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी हे अधिकारी होते. बीड तालुक्यात सुरुवातीला पाली येथील बिंदुसरा प्रकल्पाची धावती पाहणी करत पथकाने काेळवाडी परिसरातील जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर हे पथक ३. ३९ वाजता चाैसाळ्याकडे रवाना झाले. ताफा मांजरसुंब्याजवळ आला आला असता ३.४४ वाजता दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्यांनी ताफा थांबवला. या ठिकाणी शेतकरी सुनील साेळुंके व बाळासाहेब चव्हाण (रा. उदंडवगाव) यांनी अडचणी मांडल्या. साहेब सध्या पडत असलेला रिमझिम पाऊस हा हिरवळीसाठी चांगला अाहे परंतु जूनपासून घेतलेल्या पिकांसाठी कामाचा नाही. शेतीतून उत्पन्न मिळत न्हाई, असे सोळंके म्हणाले.
भवानी मंदिरासमाेरच
अडवल्या गाड्या
चाैसाळा- मांजरसुंबा येथून उस्मानाबादकडे पाहणीसाठी पथक रवाना झाल्यानंतर चाैसाळा गावाजवळील भवानी मंदिरासमाेर अधिकाऱ्यांचा ताफा येताच शेतकऱ्यांनी अडवून पिकांची पाहणी करण्यासाठी त्यांना भाग पाडले. पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे एेकत चर्चा केली. सरपंच मांजरसुंबा- चौसाळा मार्गावर ठाण मांडून बसले हाेते. "अात्ताच शेतात चला व पिकांची पाहणी करा' असा अाग्रह केला. केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांचे मत जाणून घेत पिकांची पाहणी केली.