आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत 150 ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी, धान्याची व्यवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबादेत निसर्गमित्र संस्था दृष्टी फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहरभर फिरून ‘ओंजळभर पाणी, मूठभर धान्य’ उपक्रम राबवत आहेत. - Divya Marathi
उस्मानाबादेत निसर्गमित्र संस्था दृष्टी फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहरभर फिरून ‘ओंजळभर पाणी, मूठभर धान्य’ उपक्रम राबवत आहेत.
उस्मानाबाद - उन्हाळ्यात पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून निसर्गमित्र उस्मानाबाद दृष्टी फाउंडेशन पक्ष्यांसाठी ओंजळभर पाणी, मूठभर धान्य हा उपक्रम राबवत आहे. आंतरराष्ट्रीय पक्षी गाण दिनाचे निमित्त साधून रविवारी (दि. ७) उस्मानाबाद शहरातील एसटी काॅलनी, आदर्शनगर, जिजाऊनगर या भागात १५० ठिकाणी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि धान्याची सोय करण्यात आली. विशेष म्हणजे या उपक्रमात तेथील नागरिकांना सहभागी करून घेऊन त्यांना याचे पालकत्व देण्यात आले. 
 
मागील काही दिवसात पक्षी बेशुद्ध, जखमी तसेच मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पक्ष्यांना नैसर्गिक खाद्य शहरात दुर्मीळ असतानाच उन्हाळ्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोतही दिसेनासे झाले आहेत. त्यात आपला दुष्काळी भाग. अन्न आणि पाणी शोधत असताना वाढत्या उन्हामुळे त्यांना भोवळ येत आहे. कारण वाढत्या तापमानामुळे वारेफोड्यासारखा आजार होऊन ते जमिनीवर कोसळत आहेत. आगामी महिनाभरात उन्हाळा अजून तीव्र होणार आहे, तेव्हा या मुक्या जीवांसाठी कोठेही, घरात, गच्चीवर, अंगणात, झाडावर, ऑफिसपाशी शक्य होईल तेथे घोटभर पाण्याची आणि मूठभर धान्याची सोय करा. जेणेकरून या मुक्या जीवांना जगणे सुसह्य होईल, असे आवाहन पक्षी अभ्यासक प्रा. मनोज डोलारे यांनी केले आहे. आपण जे खातो ते पक्षी सुद्धा खातात मात्र त्यात तेल असू नये. घरातील खरकटे, फळांच्या साली असे पक्ष्यांना काहीही चालते. तांदूळ, बाजरी, ज्वारी यांचा भरडा तर उत्तमच. एखादा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास त्याला थंड करण्यासाठी पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करू नका. अशाने त्यांना हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. कारण पक्षी हे उष्ण रक्ताचे असतात. भोवळ आलेल्या पक्ष्यांना सावलीत नेऊन त्याला ड्राॅपने पाणी पाजून प्रथमोपचार करा. पक्षी जखमी असेल तर प्रथम त्यास गूळ-पाणी द्यावे. हे मिश्रण त्यास सलाइनप्रमाणे गुणकारी असते. परिस्थिती हाताबाहेर असल्यास जवळील डाॅक्टरांशी संपर्क साधा. अशी माहितीही प्रा. मनोज डोलारे यांनी दिली. 
 
यांचा पुढाकार 
रविवारी राबवण्यात आलेल्या या उपक्रमासाठी प्रा. मनोज डोलारे, प्रदीप गोरे, जयराज खोचरे, संकेत सूर्यवंशी, अभिजित व्हटकर, विवेक कापसे, खंडू राऊत, नेताजी राठोड, शैलेश वाघ, सोमनाथ लांडगे, विजय पवार, संकल्प फाटक, संकल्प पडवळ, विवेक पाटील, राहुल बुरसे, प्रतीक चंदनशिवे, शुभम भोसले, संदीप देशमुख, अंकुर देशमुख आदी निसर्ग मित्रांनी पुढाकार घेतला. 
एसटी कॉलनी, आदर्शनगर, जिजाऊनगर येथे घरांसमोरील झाडांवर लावली पात्रं 
उस्मानाबादेत १५० ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी, धान्याची व्यवस्था 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...