आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तपत्र विक्रेत्यांचे राष्ट्रीय अधिवेशन; संपर्क कार्यालयाचे परभणीत उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- अखिलभारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी स्टेशन रस्त्यावरील स्टेडियम मार्केट येथे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांच्या हस्ते झाले.

जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रवीण भानेगावकर, एन. एस. गिरी, धाराजी भुसारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून संपर्क कार्यालयाचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी करंदीकर म्हणाले, वृत्तपत्र विक्रेता हा महत्त्वाचा घटक असून त्यांना आपले सहकार्य राहील.

संघटनेचे राजेश चोरमले यांनी आभार मानले. या वेळी अशोक घुसळे, सोमेश्वर लाहोरकर, सूर्यकांत मोगल, अशोक झोरे, बाबासाहेब गायकवाड, अनंता खटींग, गंगाधर भोगे, पांडुरंग खटींग, कृष्णा भोसले, राज भिडे, शुभम दांडगे, मधुसूदन जाधव, बालाजी हिंगे, प्रमोद डुबे, शंकर खटींग, प्रल्हाद टोंग, गुलाब झाडे आदी उपस्थित होते.

परभणी येथे अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या संपर्क कार्यालयाचे उद‌्घाटन जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांच्या हस्ते झाले. या वेळी धाराजी भुसारे, एन.एस.गिरी, अशोक घुसळे, सोमेश्वर लाहोरकर, राजेश चोरमले आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...