आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंड्यात पुरातन काळातील फुटी लोखंडी तोफ सापडली; पोलिस, किल्लेदारांचा परस्परभिन्न दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा- शहरात पुरातन काळातील फूट लांबीची लोखंडी तोफ किल्ल्यापासून किलोमीटर अंतरावर समर्थ नगरातील खासगी शिक्षक पतसंस्थेच्या इमारतीच्या खुल्या जागेत शनिवारी (दि.२६) आढळली. पोलिसांनी ही तोफ ताब्यात घेतली असून यामुळे खळबळ उडाली आहे. 

तोफ आढळल्यावर एक व्यक्तीने पोलिसांना दूरध्वनीवरून माहिती दिली. पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे, पोलिस उपनिरीक्षक डी. पी. सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन तोफ ताब्यात घेतली. ही तोफ परंडा किल्ल्यातील असावी, अशी प्राथमिक माहिती आहे. याप्ररणी वृत्त लिहिस्तोवर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती. मंगळवार पेठेतील वाड्याचे बांधकाम सुरू असताना तोफ सापडली. भंगार दुकानदाराने लोखंडी तोफ घेण्यास नकार दिल्याने चोरट्याने तोफ फेकून पळ काढला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी सापडलेली तोफ नसून जुन्या काळातील उखळ आहे, असे सांगितले. परंतु परंडा किल्ल्याचे किल्लेदार ज्ञानेश्वर गावडे अभिजित शिंदे यांनी ही तोफच असल्याचे सांगितले. 

विसंगत दाव्यांमुळे चौकशीची मागणी
पोलिसकिल्लेदारांच्या विसंगत दाव्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी परंडा किल्ल्यातील पंचधातूच्या तोफेची मूठ सिंहाचे तोंड कापून चोरी केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील चोरट्यांना मुद्देमालासहित पकडण्यात आले होते. दरम्यान, किल्ल्यापासून किलोमीटर अंतरावर तोफसदृश्य वस्तू आढळली आहे. सध्या किल्ल्यात दुरुस्तीसाठी उत्खनन सुरू असून लहान लोखंडी तोफा २९ आहेत. ही तोफ किल्ल्यातील नसल्याचे किल्लेदार ज्ञानेश्वर गावडे यांनी सांगितले. दरम्यान, सापडलेली वस्तू ही तोफ असून, याबाबत पोलिसांना पत्र देऊन ती पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याचे समन्वयक मयुरेश खडके यांनी सांगितले. 

चौकशी करून कारवाई 
पुरातन काळातील तोफसदृश्य वस्तू सापडल्याच्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन ती वस्तू ताब्यात घेतली. ते लोखंडी उखळ असून तोफेचा प्रकार नाही. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल. - दिनकर डंबाळे, पोलिस निरीक्षक, परंडा 
बातम्या आणखी आहेत...