आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन अनुशेषासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- वाशीम व हिंगोली जिल्ह्यांची निर्मिती एकाच वर्षात झाली आणि अकोला जिल्ह्यातून स्वतंत्र सिंचन अनुशेष वाशीमला मिळाला. मात्र, हिंगोली जिल्ह्याला स्वतंत्र अनुशेष दिला जात नाही. त्यामुळे सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजी माने यांनी दिली.
जिल्ह्याचा वाढता सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी माने गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. याबाबत त्यांनी आज पत्रपरिषद घेऊन सिंचन अनुषेशाबाबत सद्य:स्थितीची माहिती दिली. हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांचे एकत्रित सिंचनाचे क्षेत्र 13 टक्क्यांच्या वर आहे. राज्य शासनाने हिंगोली स्वतंत्र जिल्हा केला असला तरी सिंचन मात्र परभणी जिल्ह्यातच गणले जाते. वास्तविकत: अकोल्यातून वाशीम स्वतंत्र झाले आणि वाशीमला स्वतंत्र सिंचन निधी मिळाला. हिंगोलीच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही. परिणामी जिल्ह्याचा अनुशेष वाढत जाऊन सिंचनाचे क्षेत्र 6 टक्क्यांवर आले आहे. नियमानुसार किमान 13 टक्के सिंचन असणे आवश्यक आहे, परंतु राज्य शासनाच्या सापत्न वागणुकीमुळे जिल्ह्याला स्वतंत्र सिंचन निधी मिळाला नाही. सिंचन निधी खेचून आणण्यासाठी नेतेमंडळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहेत. या वेळी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, उपनगराध्यक्ष शेख नेहाल आदी उपस्थित होते.