आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is This Duplicat Modi? People Discussed In Hingoli

‘हे मोदींचे डुप्लिकेट तर नव्हे?’ हिंगोलीत उपस्थितांमध्‍ये चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - नरेंद्र मोदी नावाची आणि त्यांच्या आवाजाची मोहिनी सध्या केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पसरली आहे. ‘मेरे भाइयो और बहनो’ हे त्यांचे शब्द ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक गर्दी करत आहेत. शुक्रवारी हिंगोलीतही तेच चित्र होते. पंतप्रधान व्यासपीठावर येताच उपस्थित लोकांमधून ‘मोदी ऽ ऽ , मोदी ऽ ऽ ’ असा जयघोष सुरू झाला. मात्र व्यासपीठावरून नेहमीप्रमाणे आलेल्या ‘मेरे भाइयो और बहनो’ या आवाजात नेहमीचे माधुर्य नव्हते. त्यामुळे ‘हे मोदींचे डुप्लिकेट तर नव्हे?’ अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली. अखेर मोदींनी खास आपल्या स्टाइलमध्ये हातवारे करत भाषण सुरू ठेवल्यानंतर मात्र जनतेची खात्री पटली.

अमेरिकेहून भारतात परतताच मोदींनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाकाच सुरू केला आहे. मात्र या अतिश्रमामुळे आता त्यांचा आवाज बसला आहे. त्यामुळे शुक्रवारी त्यांच्या भाषणात नेहमीसारखा ‘चार्म’ नव्हता. हिंगोलीत तर मोदी व्यासपीठावर येऊन भाषण करू लागले तरी उपस्थितांना त्यावर विश्वास बसत नव्हता. मध्यंतरी मोदी महाराष्ट्रात असताना त्यांचा एक डुप्लिकेट नंदन मोदी शेजारच्या नांदेड जिल्ह्यात प्रचारसभा घेत होते. त्यामुळे तोच ‘मोदी’ तर आला नाही ना, अशी शंका लोक व्यक्त करत होते. मात्र मोदींनी नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलमध्ये हातवारे करत जेव्हा भाषण सुरू केले तेव्हा या स्टाइलवरून जनतेने मोदींना ओळखले व नंतर भाषण शांतपणे ऐकले. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सभेत मोदी यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हते. मात्र, घसा बसलेल्या अवस्थेतही त्यांनी दहा मिनिटांचे भाषण केले.