आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसच्या संशयितांचा जामिनासाठी अर्ज; पुढील सुनावणी हाेणार १० नोव्हेंबरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- आयएसआयएसशी (इसिस) संबंध असल्याच्या संशयावरून नांदेड येथील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर बुधवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपींना जामीन देता सुनावणी १० नोव्हेंबरला ठेवली आहे.

आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून दोन आठवड्यांपूर्वी नांदेड येथील एटीएसने नासेर चाऊस, सोहेब खान, इक्बाल, रइसोद्दीन या चार आरोपींना परभणी येथून अटक केली होती. त्यानंतर या चारही आरोपींची रवानगी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात करण्यात आली होती. या आरोपींना जामीन मिळावा म्हणून जमियतचे वकील तैवर खान अन्य तीन अशा चार वकिलांमार्फत नांदेडच्या सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी चौकशीसाठी वेळ मागून घेतल्याने न्यायालयाने आरोपींना जामीन देता पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

आरोपींच्या नातेवाइकांची न्यायालयात गर्दी : नासेरचाऊस, सोहेब खान, इक्बाल रइसोद्दीन या चारही आरोपींना भेटण्यासाठी परभणीहून त्यांचे आई, बहीण, भाऊ अन्य नातेवाईक आले होते. त्यामुळे न्यायालय परिसरात गर्दी झाल्याचे दिसून आले. सुनावणीची पुढील तारीख पुढच्या महिन्यात असल्यामुळे आरोपींना पुन्हा औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात हलवण्यात आले.

पोलिसांनी चौकशीसाठी वेळ मागून घेतली : आरोपींनानांदेड सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. एन. सचदेव यांच्यासमोर हजर केले होते. सुनावणीच्या वेळी पोलिसांच्या वतीने चौकशीसाठी वेळ मागण्यात आली. पोलिसांची बाजू सरकारी वकील पी. पी. लोखंडे यांनी मांडली.
बातम्या आणखी आहेत...