आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात ISIS नेटवर्क: शाहीद खान, नासिरबेननंतर आता तिसरा संशयित ताब्‍यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित आणखी एकाला संशयिताला परभणी जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. शेख इकबाल शेख कबीर अहमद असे या 24 वर्षीय तरुणाचे नाव असून त्‍याला महाराष्‍ट्र एटीएस पथकाने रविवारी ताब्‍यात घेतल्‍याची माहिती आहे.
- परभणीमधील मदिना नगर भागात एटीएसच्‍या पथकाने ही कारवाई केली.
- याआधी ISIS संबंध असल्याच्या संशयावरुन परभणीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.
- शाहीद खान आणि नासिरबेन असे याआधी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
- या दोघांच्या चौकशीनंतर परभणीत एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
- शाहीद, नासिरबेन आणि शेख इकबाल शेख कबीर अहमद हे तिघेही मित्र आहेत.
- शेख इकबाल शेख कबीर अहमदवरील कारवाईला एटीएसनेही दुजोरा दिला.
तीन कारवाया- नांदेड येथील एटीएस पथकाने परभणीतील गाडीवान मोहल्ल्यातून नासेरबीन चाऊस या तरुणाला अटक केली. त्‍याने बॉम्‍ब बनवण्‍याची तयारी पूर्ण केल्‍याची धक्‍कादायक माहितीही तपासात समोर आली होती. त्‍यानंतर पुन्‍हा परभणीतून शाहीद खानला अटक करण्‍यात आली. त्‍याच्‍याकडून 1 किलो स्‍फोटकही जप्‍त करण्‍यात आले आहेत. आज रविवारी परभणीतूनच तिस-या संशयिताला ताब्‍यात घेण्‍यात आले. शेख इकबाल शेख कबीर अहमद असे त्‍याचे नाव आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कोण आहे नासेरबिन....
बातम्या आणखी आहेत...