आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटावची सूचना देण्यास गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- शहरातील भाग्यनगर पूल ते मुक्तेश्वर तलाव या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सूचना देण्यासाठी गेलेल्या जालना नगरपालिकेच्या पथकातील दोन कर्मचाऱ्यांवर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रजासत्ताकदिनीच ही घटना घडली असून सॅमसन कसबे, विलास गावंडे अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

इंदिरानगर भागात १०-१२ वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे भाग्यनगर ते मुक्तेश्वर तलाव हा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभरापूर्वीच अतिक्रमणधारकांना आपापले साहित्य काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. २६ जानेवारी रोजी नगरपालिकेचे कर्मचारी सॅमसन कसबे, विलास गावंडे हे इंदिरानगर भागातील अतिक्रमण उद्या काढणार असून, संबंधितांनी आपापले साहित्य घेऊन जावे, अशा सूचना करण्यासाठी गेले होते. या वेळी अतिक्रमणधारकांनी या दोघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. दरम्यान, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पाऊल
भाग्यनगरतेमुक्तेश्वर तलाव रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात संबंधितांना एक महिन्यांपूर्वीच नोटीस देण्यात आली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच शहरातील वाहनधारकांच्या सोयीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. - दीपक पुजारी, मुख्याधिकारी,जालना, नगरपालिका