आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजारी मंडळाच्या अध्यक्षांवर १० कोटींच्या दाव्याचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापनातील गैरकारभार चव्हाट्यावर मांडून व्यवस्थापनातील अनागोंदीला लगाम घालणाऱ्या पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनाच मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदारांनी कायदेशीर नोटीस बजावून मंदिर संस्थानची बदनामी केली म्हणून १० कोटी रुपयांचा दावा करण्याचा इशारा दिला आहे.
वास्तविक पाहता पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळविलेल्या माहितीतूनच सिंहासन दानपेटीचा कोट्यवधीचा गैरव्यवहार तसेच मंदिर व्यवस्थापनातील अनेक अनागोंदी चव्हाट्यावर आलेल्या असताना त्यांनाच ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, आपणास वकिलामार्फत मंदिर संस्थानने नोटीस दिली आहे, मीही विधिज्ञामार्फतच उत्तर देणार असल्याची माहिती तुळजा भवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी दिली.
तुळजाभवानी देविच्या दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपी मंडळींच्या सत्कारावर मंदिर संस्थानकडून भक्तांच्या दानातील लाखो रुपयांची उधळपट्टी होत होती. यामध्ये व्हीआयपी नसणाऱ्या परंतु, व्हीआयपींच्या नातेसंबंधातील पाहुणे-मेहुण्यांचाही सत्कार मंदिर संस्थान करत असल्याचा खळबळजनक प्रकार किशोर गंगणे यांनी माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीतून समोर आला. याबाबत प्रसार माध्यमातून कारभाराबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर यातून कारभार सुधारणे अपेक्षीत असताना याप्रकरणात दोन उच्च पदस्थांची नावे आल्याने मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार सुजीत नरहरे यांनी थेट वकीलामार्फत पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांना कायदेशीर नोटीस बजावून मंदिर संस्थानची बदनामी केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.