आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यात पाणी, बाजारात कांदा ५० रुपये किलो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- जीवनावश्यकमानला जाणारा कांदा हळहळू किचन रूममधून गायब होऊ लागला आहे. बाजारात कमी आवक आणि शेतकऱ्यांकडे उपलब्धता नसल्याने कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. उस्मानाबादच्या बाजार समितीमध्ये मंगळवारी कांदा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. किरकोळ बाजारात हेच दर ५० रुपयांवर गेले आहेत.
गेल्या रब्बी हंगामात कांद्याच्या उत्पादनाचा वांदा झाला होता. अचानक आलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. हजारो हेक्टरवरील कांद्याचे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांकडे कांदा उरला नाही. त्यानंतर पाणी नसल्याने शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करता आली नाही. सध्या शेतकऱ्यांकडे कांदा नसल्याने बाजारात आवक थांबली आहे. उस्मानाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ते क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे. कमी आवकीमुळे व्यापाऱ्यांच्या खरेदीसाठी उड्या पडत आहेत. आवक घटत असल्याने मागणी वाढत असून, परिणामी दरही वाढत आहेत. मंगळवारी कांद्याला प्रतिक्विंटल ३४०० ते ४००० रुपये इतका दर मिळाला. तुलनेने यावर्षीचा हा दर सर्वाधिक होता, असे व्यापारी सांगत आहेत. आवक अशीच राहीली तर दर मोठ्या प्रमाणावर वाढतील, असेही सांगितले जात आहे. पाणी नसल्याने कांद्याची नवीन लागवड अत्यल्प प्रमाणात झाली आहे. कांद्याचे पीक येण्यासाठी महिन्यांचा अवधी लागतो. येत्या काळात कांदा सामान्यांना रडविणार, हे निश्चित.
भाज्या स्वस्त
गेल्यामहिनाभरापासून बाजारातील स्थिती ग्राहकांसाठी समाधानकारक आहे. पालेभाज्यांपासून फळभाज्यांपर्यंत सर्व भाज्यांचे दर खाली आले आहेत. कोथिंबीर ते रुपये, मेथी ते रुपये, मिरची १०, टोमॅटो १० ते १५, काकडी १०, वांगे १५ ते २०, भेंडी १५ ते २०, दोडका २० ते २५रुपये किलो दर आहे.
भाज्यास्वस्त का झाल्या?
मुबलकपाणीसाठा नसल्याने पाण्यावर येणारी ऊस, केळी, पपई, द्राक्ष,अशी पिके शेतकऱ्यांनी मोडून काढली आहेत. शेतकऱ्यांनी शेतात भाजीपाल्यांची लागवड केली आहे. या भाज्यांची आवक सुरू आहे. मात्र, भाज्यांना उठाव नसल्याने दर कोसळले आहेत, असे व्यापारी सांगतात.
व्यापाऱ्यांचीच चंगळ : सध्याशेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नसला तरी बहुतांश व्यापाऱ्यांचा कांदा बाजारात येत आहे. हा साठवणूक केलेला कांदा भाव खात आहे. येणाऱ्या कालावधीत बाजारात येणारा कांदा हा व्यापाऱ्यांकडीलच असण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे दर चढेच राहतील, असे संकेत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांची चंगळ सुरू झाली आहे.