आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआयच्या प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच विद्यार्थ्यांकडे, जळगावात रॅकेट सक्रीय असल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य व्यवसाय शिक्षण  व प्रशिक्षण संस्थेमार्फत १८ एप्रिलला  होणाऱ्या आयटीआय अॅप्रेन्टीसशीपच्या  फीटर व इलेक्ट्रीशियन विषयाच्या  थेअरी पेपरच्या प्रश्नपत्रिका गेल्या तीन दिवस आधीपासून विद्यार्थांकडे फिरू लागल्या आहेत.
 
या परीक्षेच्या संभाव्य प्रश्नपत्रिका ’दिव्य मराठी्रकडे प्राप्त झाल्या आहेत.  डीजीटी (दिल्ली ) संस्थेमार्फत देशभरात ही परीक्षा एकाचवेळी घेतली जाते. दरम्यान या प्रश्नपत्रिका दहा ते वीस हजार रूपयांना विकल्या जात असल्याचे दिसून आले आहे. या पेपर फुटीमागे  मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे.   
 
रेल्वेतील विविध पदांसह अन्य कंपन्यामध्ये आयटीआय होवून कामावर रूजु झालेल्या उमेदवारास कायमस्वरूपी नोकरीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यामुळे ही परीक्षा पास होण्यासाठी हजारो रूपये परीक्षार्थी खर्च करतात.   यंदाच्या वर्षापासून आयटीआय अॅप्रेन्टीसशीपच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलले आहे. १०० गुणांसाठी ५० प्रश्न हे   बहुपर्यायी आहे. मंगळवारी फीटर व इलेक्ट्रीशियन विषयाच्या थेअरीचा पेपर होणार आहे. बहुपर्यायी प्रश्नांमुळे प्रश्नपत्रिकेची मागेल ती किंमत देण्यास विद्यार्थी तयार होतात. जिल्ह्यात प्रश्नपत्रिका मिळत असल्याने मुंबई, पुण्यातील विद्यार्थी जळगाव शहरात परीक्षेसाठी येण्याचे प्रमाणही वाढले आहे. ‘दिव्य मराठी’कडे प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिकेतील योग्य पर्यायावर चिन्हांकितही केलेेले अाहे.
 
दरम्यान, या पेपरफुटीचे रॅकेट कुठेकुठे सक्रीय अाहे, त्यामागे मुख्य सूत्रधार काेण याचा अाता पाेलिसांकडून शाेध घेतला जात अाहे.

पेपरच रद्द करणार
या प्रश्नपत्रिकाच अद्याप विभागाकडे आलेल्या नाहीत, सोमवारी त्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत. मात्र ही प्रश्नपत्रिका कशी फुटली याबाबत चौकशी केली जाईल. तसे आढळून आल्यास परीक्षा रद्द करणे, किंवा पुर्नपरीक्षा घेणे यावर निर्णय घेतला जाईल.  
- एस.आर.सूर्यवंशी, उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
बातम्या आणखी आहेत...