आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगदीश रामदासी देतो मंडळांना विनामूल्य मातीच्या गणेशमूर्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- एकीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींची मोठ्या प्रमाणात मागणी होत असली तरी पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. दुसरीकडे माजलगाव येथे भटगल्लीत राहणाऱ्या जगदीश मधुकरराव रामदासी या तरुणाने मागील पाच वर्षांपासून शेणा, मातीपासून गणेशमूर्ती तयार करत त्या गणेश मंडळांना मोफत देण्याचा पायंडा पाडला आहे. त्याची ही निरपेक्ष गणेशभक्ती प्रेरणादायी ठरत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने अशा गणेशमूर्ती करता जगदीश रामदासी हा तरुण पाच वर्षांपासून छंद म्हणून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार आहे. गायीचे शेण, शाडू माती काळ्या मातीपासून सुबक संुदर गणेशमूर्ती करत आहे. एक फुटापासून फुटांपर्यंत आकर्षक गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करत आहे. आजपर्यंत माजलगाव पोलिस ठाण्यासह शहरातील विविध गणेश मंडळांनी गणपतीच्या मूर्ती तयार करवून घेऊन त्यांची स्थापना केली होती. यंदा तिरुपती बालाजी, जयमल्हार, दगडूशेठ हलवाई, वृक्ष तोड करू नका असा संदेश देणारा गणपती, स्वामी समर्थांच्या मूर्तीप्रमाणे गणेश मूर्ती साकारल्या आहेत. जगदीश रामदासी शिक्षणातून वेळ काढून गणेश मूर्ती तयार करत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्याचा हा प्रयत्न
> प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मर्तीमुळे पाणी दूषित होते. अशा मूर्तीची माती जमिनीत विरघळत नाही. पर्यावरण संतुलनासाठी शासन सामाजिक स्तरावरून जनजागृती केली जात आहे. याचा परिणाम माझ्यावर होऊन मी स्वतः पर्यावरणपूरक शाडूच्या गणेश मूर्ती तयार करून गणेश मंडळास देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. -जगदीश रामदासी, युवा मूर्तिकार, माजलगाव.

बातम्या आणखी आहेत...