आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘जय बाबाजी’ नावाचीही टोपी दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणादरम्यान ‘मैं अण्णा हूँ’ या नावाने टोपी आली. त्यानंतर आम आदमी पक्षानेही टोपी काढली. त्यामुळे गांधी टोपी घालण्याची पद्धत रूढ झाली आहे.

वेरूळ येथील जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या पर्वकालावर होणार्‍या पंचविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्याचा सर्वत्र प्रचार व्हावा या हेतूने आता हातात कडे, गळ्यात माळ यासह आता भक्तांच्या डोक्यावर ‘जय बाबाजी’ नाव असलेली टोपी दिसणार आहे. या टोपीवर ‘ओम जय बाबाजी’ असे लिहिलेले असणार आहे. सध्या या टोप्या भक्तांकडून मोफत वाटण्यात येत आहेत, तर अनेक ठिकाणी या टोपीची वीस रुपयांमध्ये विक्री करण्यात येत आहे. या जय बाबाजी टोपीचे स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या हस्ते भक्तांना टोप्यांचे वाटपही करण्यात आले.