आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणाचा जलसाठा 10 टक्क्यांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडी पाणलोट क्षेत्रातील धरणातून येणार्‍या पाण्याची आवक प्रतितास सात हजार क्युसेक सुरू असून यामुळे साठा दहा टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.

जायकवाडी धरणात 31 जुलैपासून नाशिक व नगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी दाखल होत आहे. यामुळे धरणाचा साठा झपाट्याने वाढत आहे. सध्या दारणा धरणातून 13 हजार 862 क्युसेक, गंगापूर 2 हजार 112, नांदूर-मधमेश्वर 22 हजार 590, नागमठाण 12 हजार 567, भंडारदरा 835 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. प्रत्यक्षात यातील केवळ सात हजार 387 क्युसेक पाणी जायकवाडीत दाखल होत आहे. इतर पाणी नगर जिल्हा व परिसरातील कालव्यात वळवण्यात आल्याने या ठिकाणची आवक कमी होत आहे. असे असले तरी पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत जायकवाडीची पाणी पातळी 20 टक्क्यांवर शक्यता आहे. पाणी वळवल्याने वेग कमी- वरील धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी येत असले तरी ते इतरत्र वळवण्यात आल्याने जायकवाडीत दाखल होणारे सुमारे 25 हजार क्युसेक पाणी सात हजारांवर आले आहे. दरम्यान, ओव्हरफ्लोच्या पाण्यावर गोदावरी नदीवरील विविध धरणे भरली आहेत.

औरंगाबादचा पाणीप्रश्न मिटला
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पंप हाऊसला पाणीपुरवठा करणार्‍या डाव्या कालव्यातील पाणीसाठा एक टक्का झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. सध्या साठय़ात वाढ झाल्याने पंपहाऊसला सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. यामुळे औरंगाबाद शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.