आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणाचा साठा ३७ टक्क्यांवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात २२ हजार क्युसेकची आवक मंगळवारी घटून पाच हजारांवर आली. त्यामुळे धरणाचा साठा ३७ टक्क्यांवर आला आहे. आवक पूर्ववत राहिली असती तर साठा ४० टक्क्यांवर गेला असता. परंतु वरील धरणांतून सोडलेले पाणी कालव्यात वळवण्यात आल्याने जायकवाडीतील आवक मंदावली आहे.

सोमवारी जायकवाडीत २२ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. परंतु मंगळवारी आवक पाच हजार ५१२ वर आली. त्यामुळे दुपारपर्यंत जायकवाडीची पातळी ३७ टक्के झाली होती. सध्य गंगापूर ९ हजार १७६, दारणा ६ हजार ४५७, भंडारदरा २ हजार, ओझरवेअर- एक हजार ५७६, नांदूर मधमेश्वर २६ हजार ८५५, निळवंडेतून ५ हजार १८४ क्युसेक पाणी येत आहे. मात्र, ओझरवेअरच्या डाव्या कालव्यातून ९८१, उजव्या कालव्यातून २०० क्युसेक, नांदूर मधमेश्वरच्या डाव्या कालव्याद्वारे ४७५, उजव्या ५१९ व जलद कालव्यातून ७०० क्युसेक पाणी वळवण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे.