आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडी धरणाची मदार आता परतीच्या पावसावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - मराठवाड्याची तहान भागवणार्‍या जायकवाडी धरणाचा साठा भरपावसाळ्यात ४.१२ टक्क्यांवर आला आहे. दोन दिवसांत शेलगाव तालुक्यातील ढोरा नदीचे १२ एमएम क्यूब पाणी धरणात आल्याने साठा स्थिर झाला. परंतु परतीचा पाऊस झाला नाही तर आहे ते पाणी केवळ दोन महिने पुरेल. त्यानंतर मृत जलसाठ्यातून मराठवाड्याची तहान भागवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. औरंगाबादच्या पंप हाऊसजवळून पाणी आणावे लागण्याची शक्यता आहे. त्याचे नियोजन आतापासून करण्याची आवश्यकता असल्याचे पाहावयास मिळत आहे.

आजघडीला वरील धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्याची शक्यता दिसत नाही. जायकवाडीच्या पाण्यावर साधारणपणे २५ लाख नागरिकांची रोज तहान भागली जाते. त्यात आता १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. रोज होणारा पाणी उपसा पाहता आहे ते ४ टक्के पाणी फक्त पिण्यासाठी दोन महिने पुरेल. मात्र त्यानंतर या २५ लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. यात औरंगाबाद, जालना, पैठण,अंबड, शेवगाव, गंगापूर या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई होईल.

मुख्यमंत्र्यांनी धरणाचे पाणी फक्त पिण्यासाठी राखीवची घोषणा करून एक महिना होत आला तरी त्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढलेच नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील कोणत्याच धरण अथवा बंधार्‍यातून पाणी उपसा करणारे कृषिपंप बंद करण्यात आले नाहीत. जायकवाडीचा विचार करता पंधरा हजार वीजपंपांच्या साहाय्याने रोज मराठवाड्याची तीन दिवसांची तहान भागली जाईल, एवढा पाणी उपसा होतो.