आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत आवक बंद, साठ्यात घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण -जायकवाडी धरणात येणार्‍या पाण्याची आवक आज सकाळी पूर्ण बंद झाली आहे. त्यामुळे साठ्यात घट होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या प्रारंभी धरण क्षेत्रावर जोरदार पाऊस झाल्याने धरणात येणार्‍या पाण्याची आवक दीड हजार क्युसेक झाली. त्याने धरणाच्या पाण्यात दीड टक्क्याने वाढ झाली होती. मात्र, पावसाने मध्यंतरी दडी दिल्याने धरणात येणार्‍या पाण्याची आवक कमी झाली. चार दिवसांत झालेल्या पावसाने पाणीसाठ्यात १.५६ टक्के वाढ झाली. दोन दिवसांपासून धरणात १ हजार ६४२ क्युसेकने पाणी दाखल होत होते, ते गुरुवारी सकाळी बंद झाल्याने दुपारपासून धरणाच्या पाण्यात घट होण्यास सुरुवात झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...