आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात अतिक्रमणावर हातोडा, रस्ते झाले मोकळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शहर स्वच्छतेसाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत मोतीबाग ते अंबड चौफुलीदरम्यानचा रस्ता अतिक्रमणमुक्त केला आहे. आठ दिवसांपूर्वीच अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. दरम्यान, सोमवारी कारवाई करण्यात आली.

शहर स्वच्छतेअंतर्गत 40 मायक्रॉन जाडीपेक्षा कमी प्लास्टिक वापरणे, कत्तलखान्यांमुळे वाढणारी घाण, पाणी पाऊचच्या पिशव्यांचा वाढता कचरा याची पालिकेच्या वतीने तपासणी केली जात आहे. विनापरवाना पालिकेच्या जागेवर सुरू असलेली दुकाने, टपर्‍याही हटवण्यात येत आहेत. सोमवारी टपर्‍या हटवण्यात आल्या.सकाळी दहा वाजता या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी सुमारे 30 दुकाने हटवल्याची नोंद आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजे मंगळवारी नूतन वसाहतीतील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. तशा नोटिसाही त्यांना दिल्या आहेत.

साहित्यही जप्त
संभाजी उद्यानासमोरील चौक येथे हातगाड्या, पान टपरी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टपर्‍या, चहाचे दुकान तर न्यायालयासमोरील पावभाजी च्या गाड्या, चहा-नाष्ट्याच्या हॉटेल्स या सर्व नगरपालिकेच्या जागेत होत्या. सर्वांना हटवण्यात आले असून टेबल, शेडचे साहित्य तसेच भांडीही जप्त करण्यात आली आहे.