आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना पालिकेतील रेकॉर्ड रूममधील फाइल्स भरदिवसा जाळल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जालना नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील फाइल्स जाळल्याची घटना बुधवारी दुपारी पावणेतीन वाजता घडली. या घटनेत तीन खुच्र्या, कपाट, काही फाइल्स जळाल्या. तत्काळ आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने अन्य फाइल्स आगीपासून बचावल्या. ही आग कोणी लावली याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही.

नगरपालिकेत प्रवेश केल्यानंतर पालिकेचा बांधकाम विभाग आहे. त्या ठिकाणी सात टेबल, एक संगणक, एक प्रिंटर व दोन कपाट आहे. विभागातील खुच्र्या, टेबल व बंद कपटावर रॉकेल टाकून त्याला आग लावली. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. धूर निघाल्यानंतर पालिकेतील अन्य कर्मचारी जागे झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ फाइलला लागलेली आग विझवली. या आगीत काही फाइल्स पूर्ण तर काही अर्धवट स्थितीत जळाल्या.

उपअभियंत्यासह पाच जण निलंबित- दुपारी पालिकेच्या बांधकाम विभागात एकही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे बांधकाम विभागातील तीन लिपिक, एक उपअभियंता, दोन शिपाई यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.

रॉकेलची बाटली जप्त- पोलिसांनी घटनास्थळावरून रॉकेलची बाटली हस्तगत केली. रॉकेल टाकून आग लावण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आगीत किती फाइल्स जळाल्या याचा आकडा समोर आला नव्हता.