आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याच्या 781 पैकी 214 ग्रामपंचायतींना रेड कार्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जिल्ह्यातील 781 ग्रामपंचायतींपैकी 214 ग्रामपंचायतींमध्ये पाण्याचे शुद्धीकरण अनियमित होत असून त्या ठिकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याचा प्रकार समोर आहे. पाणी गुणवत्ता व संनियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली असून 214 ग्रामपंचायतींना रेड कार्ड देण्यात आले आहे. तर 331 ग्रामपंचायतींमध्ये शुद्ध पाणीपुरवठा व परिसर स्वच्छ असल्यामुळे ग्रीन कार्ड देण्यात आले.


पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाणी गुणवत्ता व संनियंत्रण समितीमार्फत दरवर्षी मार्च ते मे व पावसाळ्यानंतर माहे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात जलस्रोत, पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणांच्या पाण्याची पाहणी करण्यात येते. पाऊस झाल्यानंतर ते पाणी परिसरातील जलस्रोत जाते. तसेच जलस्रोत, विहिरी, हातपंप यांच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असेल तर ते पाणी जलसाठ्यात मिसळून पाणी दूषित होते.


शुद्धतेचे निर्देश
जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना रेड कार्ड देण्यात आले आहे त्यांना नियमित, स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, पाण्याच्या स्रोताची स्वच्छता करून व ब्लीचिंग पावडर टाकावे. यासाठी ग्रामपंचायतींतील जलसुरक्षक, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचा-यांना सांगण्यात आले आहे. लोकांनीही जागरूक असावे.
पद्माकर केंद्रे, डेप्युटी सीईओ, झेडपी