आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव द्या; अधिकाऱ्यांना आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- नियम डावलून कामे केल्यामुळे जालना पालिका मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना िदल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर यासंबंधी कर नाही त्याला डर कशाची, अशी प्रतिक्रिया पुजारी यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांपुढे जाणार असून त्यांच्या स्वाक्षरीनंतरच निलंबनाची कारवाई होऊ शकते, असेही कळते.

सामनगाव येथील घनकचरा प्रकल्पाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता न घेता निविदा काढणे, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानासुद्धा अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही न करणे, शहरात रिक्षा थांबे तयार करण्याचे काम ई-टेंडरिंग न करताच परस्पर देणे, पालिकेच्या मोकळ्या जागांची नोंद न करणे व भाडे न आकारणे, करांची वसुली करण्यात दिरंगाई, डीपी रोडवरील अतिक्रमणे न काढणे आदी विषय निलंबनाच्या प्रस्तावात नमूद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले.

पालिकेत सामान्यांची होतेय अडवणूक
बांधकाम परवाने वेळेवर न मिळणे, अडवणूक करणे, अधिकारी गैरहजर असणे यामुळे पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. यासह अनेक नागरी समस्यांबाबत पालिकेच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या आहेत. याचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे.