आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस जिवे मारणार्‍या शिक्षकाला जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस जिवे मारणार्‍या अंबड तालुक्यातील मसई जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश (द्वितीय) आशुतोष एन. करमकर यांनी जन्मठेप सुनावली. सांडू किसनराव शेळके (40, वाघलखेडा, ता. अंबड) असे शिक्षकाचे नाव आहे.
अंबड शहरातील धाईतनगर भागात 28 नोव्हेंबर 2012 रोजी पहाटे 4 ते 5 वाजेदरम्यान मंदा सांडू शेळके या विवाहितेचा मृत्यू झाला होता. मंदा हिचा विवाह 20 वर्षांपूर्वी सांडू शेळके याच्यासोबत झाला होता. शेळके दांपत्यास एक मुलगी व दोन मुले झाली. मात्र, तरीही सांडू शेळके हा पत्नी मंदाच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देत असे. दरम्यान, 28 नोव्हेंबरच्या रात्री सर्व कुटुंबीयांनी 12 वाजेपर्यंत टीव्हीवरील कार्यक्रम बघितले. त्यानंतर पहाटे 4 ते 5 वाजेदरम्यान सांडू शेळके याने पत्नी मंदा हिचा शालीने गळा आवळला व त्यानंतर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यात मंदाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मंदाचे वडील बाजीराव मांगडे (बारसवाडा, ता. अंबड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंबड पोलिसांनी आरोपीविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे सुनावणीदरम्यान 12 साक्षीदार तपासण्यात आले.