आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसवर दगडफेक करून चालक, वाहकास मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - एसटीवर दगडफेक करीत चालक आणि वाहकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार अंबड तालुक्यातील रुई येथे सोमवारी घडला. याप्रकरणी अज्ञात दोघांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड आगाराची भोगगाव-अंबड ही बस (एमएच १४ बीटी ०२४१) सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास रुई गावाजवळ आली असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी (एम एच २० डीएल २२७) बस अडवली व चालक जवाहरलाल जाधव यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. वाहक गजानन गिराम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही मारहाण करून चालकावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, या वेळी वरील दोघांनी केलेल्या दगडफेकीत बसची काचही फुटली. याप्रकरणी चालक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बसचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
बातम्या आणखी आहेत...