आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीच्या अर्जात तांत्रिक अडचणी, ग्रामीण भागात शेतकऱ्यांसह केंद्र चालकही हैराण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - भोकरदन तालुक्यातील शेतकरी कर्ज माफीचा अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे त्रस्त झाले आहेत. शासनाने कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहे या नुसार भोकरदन तालुक्यातील शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महा ई सेवा केंद्रामध्ये गर्दी करीत आहे. मात्र, अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने शेतकरी रांगा लावूनही रिकाम्या हाताने परत जात आहेत. 
 
शासनाने दिलेल्या साईटमध्ये अनेक अडचणी येत आहेत. ही साईट उघडत असली, तरी अपुऱ्या माहितीमुळे फॉर्म भरण्यास अडचणी येत आहेत. 
 
अनलाईन अर्ज साठी आधार कार्ड लिंक असलेले भ्रमणध्वनी क्रमांक वर ओ टि पी दिला जातो परंतु अनेकांचा भ्रमंनध्वनी आधार शी लिंक नाही.
 
अनेक शेतकरी कर्ज माफीचा अर्ज घेऊन येत आहे मात्र या साईट मध्ये अनेक अडचणी येत असल्याने फार्म भरल्या जात नसल्याने शेतकरी नाविलाजने परत जात आहे डीव्हाइस अधारलिंक असल्या अर्ज पूर्णपने भरल्या जाणार आहे.
मंगेश आढाव,  केंद्र चालक महा ई सेवा केंद्र, दानापूर
 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजना कर्ज माफीचा फार्म ऑनलाईन करण्या साठी दिवस भर लाईन मध्ये थांबून देखील फार्म भरल्या जात नसल्याने परत जावे लागत आहे या गैर सोई संदर्भात उपाय योजना होने फार गर्जे चे आहे.
 
भूषण पवार, शेतकरी, दानापूर
बातम्या आणखी आहेत...