आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalna Four Accused Police Custody News In Marathi

जालन्यातील खूनप्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शहरातील द्वारकानगर भागात भगवा झेंडा काढण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून अन्य दुसरा गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. शेख वसीम शेख नसीर (22, द्वारकानगर) असे मृताचे नाव असून शेख असीफ शेख याकूब हा गंभीर जखमी झाला आहे. यातील आरोपी सचिन पठाडे, अंकुश पठाडे, परमेश्वर अंभोरे व विनोद यादव या चौघांना तालुका पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. क्षीरसागर यांच्यासमोर हजर केले असता 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
याप्रकरणी जखमी शेख असीफ शेख याकूब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघा आरोपींनी भगवा झेंडा काढण्याच्या कारणावरून हाणामारीत आरोपींनी तलवार व सुरीने वार करून शेख वसीम शेख नसीर यास जिवे मारले, तर शेख असीफ शेख याकूब यास गंभीर जखमी केले. दुसर्‍या फिर्यादीत लता भीमराव अंभोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा परमेश्वर अंभोरे व आरोपी शेख असीफ शेख याकूब आणि शेख वसीम शेख नसीर यांच्यात सुरू असलेले भांडण सोडवण्यास त्या गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी शेख असीफ शेख याकूब आणि शेख वसीम शेख नसीर यांनी संगनमताने तलवार व सुरीने हातावर मारले.