आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालन्यातील तरुणीचा लष्कर भरतीत मृत्यू, उष्माघाताच्या कारणाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लातूर - चाकूर येथे लष्कर भरतीत धावण्याची चाचणी सुरू असताना तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपाली साहेबराव वाकुडे (२२, वरूड बु., ता. जाफराबाद, जि. जालना) असे मृत तरुणीचे नाव असून ती आपल्या वडिलांसोबत भरतीसाठी आली होती. चाकूर येथे सीमा सुरक्षा दलाचे सहायक प्रशिक्षण केंद्र आहे. आनंदवाडी मैदानावर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. भरतीदरम्यान धावण्याची चाचणी सुरू होती. त्या वेळी दीपाली धावत असताना तिला दम लागला आणि तिने पाणी मागितले. पाणी प्यायल्यानंतर तिचा मृत्यू झाला. चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमान वाढले असून पारा ४३ अंशांवर गेला होता. मंगळवारीही ४० अंशाची नोंद झाली होती. परंतु प्रत्यक्षात तापमान ४२ असल्याची तीव्रता उन्हात होती. त्यामुळे उष्माघात झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
व्हिसेरा प्रयोगशाळेकडे
^मृताचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा व्हिसेरा लातूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
डॉ. एल. एस. देशमुख, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चाकूर
बातम्या आणखी आहेत...