आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथालयातील बालकांना "मायेच्या गोधडी'ची ऊब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - अनाथाश्रमात राहणाऱ्या बालकांना थंडीचा त्रास होऊ नये, यासाठी येथील राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थिनींनी उबदार कपडे देण्यासाठी "मायेची गोधडी' उपक्रम राबवला. गल्लोगल्ली फिरून जुने कपडे, पांघरूण व आर्थिक मदत गोळा केली. त्यातून दर्जेदार गोधड्या तयार करून शहरातील स्वामी विवेकानंद बालकाश्रम आणि संत कबीर बालकाश्रमातील बालकांना वाटप
करण्यात आल्या.
शिक्षक संदीप जनार्दन गाडेकर यांनी "मायेची गोधडी' हा उपक्रम हाती घेतला. हा उपक्रम त्यांनी व त्यांची विद्यार्थिनी पल्लवी शिवाजी कुटे हिने संयुक्तपणे राबवला. यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन जुने कपडे, साड्या, बेडशीट आदी कपडे जमा केले. शिक्षक कॉलनी, गायत्रीनगर, दत्तनगर, भालेनगरी आदी भागात कपडे व पैसे गोळा करण्यात आले. जमा झालेल्या सर्व कपड्यांपासून दर्जेदार ५५ गोधड्या तयार करण्यात आल्या. तसेच रोख स्वरूपात जमा झालेले ४ हजार रुपये यासाठी खर्च करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एका कुटुंबाकडून प्रत्येकी १० रुपये व जुने कपडे घेण्यात आले. या तयार झालेल्या गोधड्या स्वामी विवेकानंद बालकाश्रम व संत कबीर बालकाश्रम येथे वितरित करण्यात आल्या. यासाठी विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी सहकार्य केले. वितरण कार्यक्रमासाठी साक्षी कुटे, निकिता सोनवणे, निकिता क्षीरसागर, वैष्णवी गोगरोड, राज कुटे आदींनी मेहनत घेतली.

अनाथांना सहायता
काही वर्षांपासून अनाथ मुलांबरोबर शाळेच्या मुलांना एकत्र करून सण-उत्सव साजरे करण्याचे उपक्रम घेत होतो. मात्र, बालकाश्रमातील मुलांच्या गरजा पाहून उबदार कपडे पुरवण्याचा या वर्षीपासून उपक्रम विद्यार्थिनी पल्लवी कुटेच्या साथीने हाती घेतला आहे.''-संदीप गाडेकर, शिक्षक
बातम्या आणखी आहेत...