आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकरदनमध्‍ये तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुकाराम जाधव - Divya Marathi
तुकाराम जाधव

राजूर (ता.भोकरदन) - तलावावर पोहण्यास गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. भोकरदन तालुक्यातील उंबरखेड येथे मंगळवारी दुपारी 2 वाजता ही घटना घडली. तुकाराम संजय जाधव आणि विशाल दिगंबर फुके (दोघेही 9 वर्षे) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.


हे दोन्ही विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होते. दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यावर अन्य एका मित्रासोबत गावालगत असलेल्या तलावावर पोहण्यासाठी गेले. पोहता येत नसल्याने ते तलावात बुडाले.
संजय व विशाल दोघेही वर न आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या अन्य एकाने गावात येऊन हा प्रकार सांगितला. घटना घडली तेव्हा दोघांचेही आईवडील शेतात गेले होते. हसनाबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी दोघांवरही उंबरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.