आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएसआय व्यवहारेला लाच घेताना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - मारहाण प्रकरणातील आरोपीस अटक करण्यासाठी 10 हजारांची लाच स्वीकारणार्‍या परतूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक शिवनाथ व्यवहारे (53) यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी 3.20 वाजता ठाण्यातच रंगेहाथ पकडले.
तुकाराम भुजंग चव्हाण (35, हातडी, (शिंदे) ता. घनसावंगी, जि. जालना) यांनी तक्रार केली होती. 11 मे रोजी परतूर येथील गार्डन हॉटेलसमोर तुकाराम चव्हाण मित्रासमोर थांबले होते. नाथ्या पांड्या काळे व इतर साथीदारांनी मारहाण केल्यामुळे चव्हाण यांचे डोके फुटले होते. प्रकृती चांगली झाल्यानंतर चव्हाण यांनी परतूर पोलिस ठाण्यात व्यवहारे यांची भेट घेतली. आरोपींना अटक करण्याची विनंती त्यांनी केली. व्यवहारे यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली. चव्हाण यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.