आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - तालुक्यात गुरुवारी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. हरतखेडा येथील सुरेश केशव येडे (५५) या शेतकऱ्याने बुधवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने सुरेश येडे यांना दीड एकर शेतात राबराब राबूनही उत्पादन मिळत नव्हते. त्यातच त्यांच्याकडे दोन बँकांचे कर्ज होते. दुसऱ्या घटनेत बावणे पांगरी येथील रामेश्वर उत्तम बोराडे यांनी गावापासून जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. बोराडे यांनी मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता होते. दरम्यान गुरुवारी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.