Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Jalna ZP Candidate On Tour

जालना: शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे झेडपी सदस्य एकत्र सहलीवर, मोठी राजकीय खेळी करणार

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 09:52 AM IST

  • जालना: शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे झेडपी सदस्य एकत्र सहलीवर, मोठी राजकीय खेळी करणार
जालना- जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. मिनी मंत्रालयात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने जोर लावला आहे. यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळेच या तिन्ही पक्षांचे सदस्य एकत्रित अज्ञात ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे भाजप ऐनवेळी मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयावर ताबा कुणाचा यासंदर्भात अनिश्चितता कायम आहे.

भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून त्यांना बहुमतासाठी केवळ सदस्यांची आवश्यकता आहे, तर दुसरीकडे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी भाजप सोबत जाता राष्ट्रवादी, काँग्रेसला सोबत घेऊन मिनी मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच चार दिवसांपूर्वी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सदस्य अज्ञात ठिकाणी सहलीवर रवाना करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे या तिन्ही पक्षांचे जवळपास ३२ सदस्य एकत्रितपणे एकाच ठिकाणी रवाना केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपला बाजूला ठेवण्याची तयारी झाल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत भाजपनेही सावध भूमिका घेतली आहे. भाजपचे जिल्ह्यातील काही प्रमुख नेते या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भाजपकडून मोठी राजकीय चाल खेळली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यानुसार भाजपच्या एका नेत्याने औरंगाबाद जिल्हा परिषद आणि जालना जिल्हा परिषद अशा दोन्ही जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीवर एकमत होईल, असा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, त्याला खूपच उशीर झाला असल्याने आता निर्णय बदलणार नाही, असे शिवसेनेच्या गोटातून सांगितले.

स्थानिक नेते अनभिज्ञ
आपलापक्ष कोणत्या पक्षासाेबत जाणार आहे स्थानिक नेत्यांनी निर्णयाची माहिती नाही असे सांगत हात झटकले आहेत. नेते सांगतील त्यांच्यासोबत जाणार असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे गटनेते सतीश टोपे यांनी मात्र राष्ट्रवादी ,काँग्रेस सत्तेत राहील, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेसोबत जाणार का यावर,आता सांगता येणार नाही सभागृहात स्प्ष्ट होईलच असे सांगितले.

भाजपकडून जोरदार प्रयत्न
कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात ठेवायची यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भाजपनेही आपले सदस्य अज्ञात ठिकाणी सहलीवर रवाना केले आहेत. यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना यांचे काही सदस्य गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच असेल असे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेस -राष्ट्रवादीचा एक गट
या वेळेला प्रथमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही पक्षांतील सदस्यांचा एकत्रित गट स्थापन केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे असा १८ सदस्यांचा हा गट असून गटनेतेपदी राष्ट्रवादीचे सतीश टोपे यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषदेसाठी प्रथमच अशा पद्धतीने गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Next Article

Recommended