आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: सुमित्रा होंडे प्रकरण; होंंडे कुटुंबीयांची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड- येथील सुमित्रा होंडे खून प्रकरणातील तपास योग्य दिशेने व्हावा तसेच कुटुंबातील अन्य पाच अारोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मृत सुमित्रा होंडे यांचे वडील विश्वंभर तारख अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र, त्यांच्या मागणीचा विचार होत नसल्याने अखेर त्यांनी सोमवारपासून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, होंडे कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी शनिवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले.
  
विश्वंभर तारख यांनी शुक्रवारी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयास निवेदन दिले आहे.  २  जानेवारी रोजी  निवेदनात सुमित्रा होंडे यांच्या खून प्रकरणात पती सतीश अण्णासाहेब होंडे, दीर डॉ. भरत अण्णासाहेब होंडे, जाऊ डॉ. सीमा भरत होंडे, सासरे अण्णासाहेब होंडे व चुलत सासरे नानासाहेब होंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, स्थानिक पोलिस यंत्रणेने केवळ विलास होंडे यास अटक करून अन्य आरोपींना सोयीस्कर पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...