आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर शहरात पहिल्या दिवशी दोन कोटी रुपयांचा निधी जमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरातील विविध संस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त लातूर अभियानाला गुढीपाडव्याच्या दिवशी उत्साहात प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवसापर्यंत या अभियानासाठी सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंतचा निधी एकत्र झाला अाहे.
साई गावात मांजरा नदीच्या खोलीकरणाचा प्रारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. अशोक कुकडे, मनोहर गोमारे, बी. बी. ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जेसीबी यंत्राचे पूजन करून श्रीफळ वाढवून कामाला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी सात मशीन आणि दोन टिप्पर या कामासाठी देण्यात आले आहेत.

उर्वरित तीन मशीन दोन दिवसांत कार्यान्वित होत आहेत. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी उद््घाटनाच्या भाषणात सध्याची टंचाई आणि त्यावर शासन करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. लोकांनी सुरू केलेल्या या अभियानात प्रशासन पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अशोक कुकडे यांनीही हा प्रयोग राज्यात पहिलाच असून तो राज्यभर चर्चिला जात असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपला एक दिवसाचा पगार या कामाला मदत म्हणून देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक मकरंद जाधव यांनी या वेळी प्रास्ताविकात या कामाचे स्वरूप, त्याचा संभाव्य फायदा ग्रामस्थांना समजावून सांगितला. बी. बी. ठोंबरे यांनी लातूर शहराचे पाण्याअभावी झालेले हाल आणि त्यामुळे शहराच्या वाट्याला आलेली नामुष्की कायमची हद्दपार करण्यासाठी हे लोकअभियान सुरू झाल्याचे सांगितले. यावर्षी दुष्काळ पाहायला येणारी मंडळी पुढच्या वर्षी आपण लोकसहभागातून केलेल्या कामातील पाणी पाहायला येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्र्यंबकदास झंवर यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगने गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात केलेल्या कामांची उदाहरणे दिली. या ठिकाणी अद्यापही चांगले पाणी उपलब्ध असल्याचे सांगत त्यांनी खोलीकरणाच्या कामाचे महत्त्व अधोरेखित केले. या वेळी मनोहर गोमारे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, विक्रम गोजमगुंडे, अरुण डंके, विशाल अग्रवाल, दिलीप माने, विलास चामे यांचीही भाषणे झाली.
निधीचा ओघ सुरू
गेल्या चार दिवसांपासून जलयुक्त लातूर या लोकअभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. सुमारे सात कोटी रुपयांचा हा प्रकल्प लोकांनी दिलेल्या पैशातून करण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर निधीचा ओघ सुरू झाला. दोन दिवसांपासून लातूरमधील प्रत्येक जण आपापल्या परीने निधी देऊ करत आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमातही बहुतांश जणांनी आपापल्या निधीचे आकडे जाहीर केले. पहिल्याच दिवशी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी एकत्र झाला आहे. उद्योग भवनाशेजारी असलेल्या एमबीएफच्या कार्यालयातच जलयुक्त लातूरचे कार्यालय सुरू करण्यात आले असून तेथे निधी जमा करण्याची सोय करण्यात आली आहे.

बाटलीबंद पाणी माफक दरात विकण्याच्या सूचना
शहरात तीव्र पाणीटंचाई असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पाणी विक्रीचे दर नियंत्रित व माफक ठेवण्याच्या सूचना बाटलीबंद (आरओ) कंपनी मालकांना उपविभागीय अधिकारी प्रताप काळे यांनी दिल्या. २० लिटर जार प्लांटवर १५ रुपयांस, तर तोच घरपोच असल्यास २५ रुपयास द्यावा, असेही त्यांनी सुचवले.
पुढील स्लाइडमध्ये,
१६ कोटी रुपये खर्चूनही तेरचा घसा कोरडा