आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडला जलयुक्तची कामे रद्दसाठी ठराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीला अंधारात ठेवून जलयुक्त शिवारातील कामांना जिल्हा प्रशासनाने नियमबाह्यपणे मंजुरी दिली असून १ कोटी ७९ लाख ६०० कामे रद्द करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला आहे.

ही कामे रद्द झाली नाहीत, तर न्यायालयात जाण्याचा इशारा झेडपी अध्यक्षांनी दिला आहे.
जलयुक्त शिवार अभियानच्या पुढील वर्षाच्या टप्पा क्रमांक एकअंतर्गत जिल्ह्यातील १४० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे उद्भव बळकटीकरणासाठी ८ कोटी ५३ लाख रुपयांच्या २३४ कामांना मान्यता देण्यात आली असून या कामांवर आता जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीने आक्षेप घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत ही कामे प्रशासनाने मागवून घेतली असून समितीला डावलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेला विश्वासात न घेता या कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. आता याला जलव्यवस्थापन समितीने विरोध केला आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत नियमबाह्य कामे रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला असून हा ठराव जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा व्यवस्थापन समितीने दिलेली यादी व प्रस्तावानुसारचीच कामे मंजूर करावीत, असे जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी म्हटले आहे.

शून्य ते शंभर हेक्टरातील कामे
पूर्वीही जिल्हा प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियानच्या ५५ कोटी रुपयांच्या कामांपैकी केवळ पावणेचार कोटींंची कामे झेडपीला दिली होती. मंजूर करण्यात आलेली पंधरा कामे १ कोटी ७९ लाख रुपयांची आहेत. ही कामे शून्य ते १०० हेक्टरातील आहेत, असा दावा झेडपीने केला.
"ती' कामे रद्द करा
^जिल्हा परिषदेत आज आम्ही जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत जलयुक्तची मंजूर करण्यात आलेली नियमाबाह्य कामे रद्द करावीत, असा ठराव घेतला असून जिल्हा प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा आम्ही न्यायालयात जाणार आहोत.'' विजयसिंह पंडित, अध्यक्ष, जिल्हा परिषद