आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजारांची लाच घेताना जमादार चतुर्भुज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - हाणामारी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात जेरबंद न करता कागदोपत्री अटक दाखवण्यासाठी पाच हजारांची लाच घेणा-या जमादाराला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी व कर्मचा-यांनी सोमवारी गंगाखेड पोलिस ठाण्याच्या परिसरात रंगेहाथ पकडले. गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील रहिवासी गोविंद नामदेव लटपटे यांच्याविरुद्ध हाणामारीप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात 12 डिसेंबर 2011 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जेरबंद न करता कागदोपत्री अटक दाखवण्यात येईल, त्यासाठी दहा हजार रुपये लागतील, असे गंगाखेड ठाण्यातील जमादार एस. जी. सोनटक्के यांनी लटपटे यांना सांगितले. तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले. यादरम्यान लटपटे यांनी परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. सोमवारी रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार पोलिसांनी अगोदरच सापळा रचला होता. पोलिस ठाणे परिसरात लाच घेताना जमादार एस. जी. सोनटक्के यांना रंगेहाथ पकडण्यात आले.