आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jawahar Navdoy Examination Issue At Jalna, Divya Marathi

जालन्यात नवोदय परीक्षेचा पेपर उशिरा दिला; पालकांची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- जवाहर नवोदय विद्यालयातर्फे जिल्ह्यात शनिवारी नवोदय प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली. येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे हॉल क्रमांक १७ व १८ या परीक्षा केंद्रावर अनुक्रमे १५ ते २० मिनिटांनी उशिरा पेपर दिल्याची तक्रार पालकांनी केली.

शनिवारी सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत जालना शहरातील जि.प.मुलींची शाळा येथे हॉल क्रमांक १७ आणि १८ यामध्ये अनुक्रमे १५ ते २० मिनिटांनी उशिरा पेपर दिला. यासंदर्भात मुलांनी शिक्षकांकडे तक्रार केली. मात्र, शिक्षकांनी दुर्लक्ष केल्याने मुलांनी पालकांना माहिती दिली. पालकांनी केंद्रप्रमुखांना विचारणा केली असता कुठलीही चर्चा न करता परत पाठवले असल्याचे पालक शिवराज तळेकर, कृष्णा कुडे, रामेश्वर रोटे यांनी सांगितले.

सेलूतही अर्धा तास विलंब
सेलू - जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी शनिवारी सकाळी साडेअकरा ते दीडदरम्यान होणारी परीक्षा शहरातील दोन्ही केंद्रांवर अर्धा तास उशिराने सुरू झाली. परीक्षा केंद्रावर पेपरच वेळेवर उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा प्रकार घडला.

सेलू तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी येथील नूतन विद्यालय व नूतन कन्या प्रशाला अशी दोन केंद्रे होती. प्रश्नपत्रिकाच उपलब्ध नसल्यामुळे ११.३० सुरू होणारी परीक्षा नूतन विद्यालयात १२ वाजता, तर नूतन कन्या प्रशालेत १२ वाजून ५ मिनिटांनी सुरू झाली. अर्धा तास झालेला विलंब विद्यार्थ्यांना वाढीव अर्धा तास देऊन भरून काढण्यात आला. दरम्यान, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. लक्ष्मणन यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.