आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणात २५ दिवसांत ६.०९ टीएमसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - औरंगाबाद, जालना, पैठणसह ४०० गावांची तहान भागवण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी सोडलेल्या १२.८४ टीएमसी पाण्यापैकी जायकवाडी धरणामध्ये २५ दिवसांत ६.०९ टीएमसी पाणी दाखल झाले. वरील धरणातून आजपर्यंत १०.१३ टीएमसी पाणी सोडण्यात आले असून आणखी २.७१ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. सध्या निळवंडे धरणातून २ हजार ९०० क्युसेकने जायकवाडीसाठी पाणी सोडले जात आहे. हे पाणी आणखी दहा ते बारा दिवस सुरू राहणार असल्याने जायकवाडीत आणखी आर्धा टीएमसीची वाढ अपेक्षित असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
वरील धरणातून जायकवाडीसाठी एकूण १२.८४ टीएमसी पाणी सोडले जाणार होते. त्या पैकी गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी, दारणातून ३.२४ टीएमसी, प्रवरा समूहातून ६.५० टीएमसी, मुळा धरणातून १.७४ टीएमसी पाणी सोडले. त्या पैकी सध्या निळवंडेतून दोन हजार क्युसेकने आवक होत आहे. यातून व सध्या मुळाच्या दोन कालव्याद्वारा २३३ क्युसेकने सध्या जायकवाडीत एक हजाराची आवक सुरू अाहे. मात्र, आता फक्त २.७१ टीएमसी पाणी वरील धरणातून सोडणे बाकी आहे.
पाणीटंचाई भेडसावणार
सध्या जायकवाडी धरणात पाणीसाठा कमीच आहे. त्यामुळे या पाण्यावर उद्योगाची १० टक्के पाणी कपात कायम आहे. ती पुढेही राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पिण्याच्या पाण्यातही कपात केली जाणार आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर व जालना आणि गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.
पाण्याची चोरी कायम
सध्या निळवंडेतून पाणी गोदावरी पात्रात सोडले जात आहे. या पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होत असून पाण्याच्या चोरीबरोबरच पाण्याचा वेग कमी असल्याने पाणी झिरपण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे.
एक टीएमसी पाणी कमी
पाटबंधारे प्रशासनाने साडेसात ते आठ टीएमसी पाणी येईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र पाण्याचा वेग सुरुवातीपासूनच कमी राहिल्याने पाणी जायकवाडीत उशिरा दाखल झाले. एक टीएमसी पाणी अपेक्षेपेक्षा कमी येत आहे.
१ टीएमसी पाणी कमी
जायकवाडीत कमी वेगाने पाणी सोडले गेल्याने अधिक पेक्षा पाणी झिरपले गेले. त्यामुळे अपेक्षापेक्षा एक टीएमसी पाणी कमी येताना दिसत आहे.
अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.
पुढील स्‍लाइडवर वाचा, असा आहे पाणीसाठा..