आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jayakwadi Dam News In Marathi, Water Authority, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडीत १५ ऑक्टोबरनंतर पाणी सोडण्याचे जल प्राधिकरणाचे आदेश आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडी धरणात जायकवाडीच्या वरील प्रकल्पातून १५ ऑक्टोबरनंतर पाणी सोडण्यात यावे, असे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शुक्रवारी (दि.१९) दिलेल्या निकालामध्ये दिले आहेत. परभणी येथील याचिकाकर्ते अभिजित जोशी-धानोरकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत त्याची माहिती दिली.
निकालानुसार सध्या उपलब्ध पाणीसाठा ४६ टक्के (मेंढेगिरी समिती सूत्रानुसार) आहे. १५ ऑक्टोबर रोजी होणारा पाणीसाठा विचारात घेऊन जायकवाडीमधील साठा ६५ टक्क्यांपर्यंत नेणे बंधनकारक आहे.
असे आहेत आदेश : जायकवाडी धरणाच्या वरील प्रकल्पांतून केला जाणारा पिण्याच्या पाण्याचा व औद्योगिक वापरासाठीचा पाणीपुरवठा पाइपलाइनद्वारे करण्यात यावा. गोदावरी नदीवरील कोल्हापुरी बंधा-यांमध्ये पावसाळ्यात पाणी अडवण्यात येऊ नये, याचबरोबर भर पावसाळ्यामध्ये वरील प्रकल्पांतून कालव्याद्वारे होणारे सिंचन तसेच शेततळी व इतर सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीसाठा जायकवाडीच्या धरणामध्ये क्षमतेएवढे पाणी आल्यानंतरच करण्याची परवानगी दिलेली आहे. दोन वर्षांपासून समन्यायी पाणीवाटपाचा खटला हायकोर्टात सुरू आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार या संदर्भातील सुनावणी प्राधिकरणाकडे सुरू होती. यावर प्राधिकरणाने हा निकाल दिला आहे. मुख्य याचिकाकर्ते आमदार प्रशांत बंब हे असून जायकवाडीचे सर्वात मोठे एक लाख हेक्टरचे लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात असल्याने जिल्ह्याच्या वतीने आपण याचिका दाखल केली होती, असे धानोरकर यांनी सांगितले.
आदेशात याचाही उल्लेख
* ब्लॉक सिस्टिमनुसार पाणी वापरावर बंधने आणली आहेत.
* जलसंसाधन विभागाने सर्व कालवे हे व्यवस्थित सुरू राहतील, जेणेकरून शेवटी असलेल्या लाभक्षेत्रास पुरेसे पाणी मिळेल, याची दक्षता घ्यावी.
* ठिबक सिंचन हे जायकवाडी प्रकल्पाच्या वरील प्रकल्पामध्ये फळबागा व त्या अनुषंगाने घेतल्या जाणा-या पिकांसाठी सक्तीचे करण्यात यावे.
* कमाल औद्योगिक वापर निश्चित करून विहित कमाल मर्यादेअंतर्गत औद्योगिक क्षेत्रास पाणी वळवण्यात यावे.
पाण्याचे दोन रोटेशन वाढणार
सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर जायकवाडी लाभक्षेत्रास पाण्याची तीन रोटेशन देता येऊ शकतात. वरील प्रकल्पांतून जायकवाडीमध्ये पाणीसाठा ६५ टक्क्यांपर्यंत आल्यावर जायकवाडी लाभक्षेत्रास पाण्याचे आणखी दोन रोटेशन मिळतील. या निकालाबरोबरच माजलगाव धरणाचा प्रतिवर्षी पाणीसाठा निर्धारित वेळेत माजलगाव धरणास देण्यात यावा, असाही आदेश देण्यात आला आहे.