आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा: जायकवाडीत संथगतीने वाढ, साठा २.६० टक्के

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- जायकवाडी धरणात सध्या होत असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. त्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा २.६० टक्क्यांवर आला आहे

जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये पावसाने उघडीप दिली असली, तरी धरणात ६१५ दलघमी क्युसेक प्रति तास वेगाने पाणी मागील आठ दिवसांपासून येत आहे. हे पाणी येण्यापूर्वी धरणाचा पाणीसाठा १.६५ टक्के होता. ८ जूनच्या पावसाच्या पाण्यावर धरणात ६ हजार ५९५ क्युसेक वेगाने पाणी आले, यावर धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढला. मात्र, मागील चार दिवसांत पावसाने ओढ दिल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली.

जायकवाडीच्या पाण्यावर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणीच्या काही भागांची तहान भागवली जाते. उन्हाळ्याच्या शेवटी धरणाचा पाणीसाठा मृत साठ्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, यंदा पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने धरणाच्या साठ्यात वाढ होण्यास प्रारंभ झाला खरा, पण केवळ धरणाच्या परिसरातील पावसावर धरणाच्या पाण्यात विशेष वाढ होत नाही. त्यात वाढ होण्यासाठी वरील भागातील धरणातून पाणी येणे आवश्यक आहे. मात्र, वरील धरणे भरल्याशिवाय खाली पाणी सोडत नसल्याने आजघडीला वरील धरणातून जायकवाडीत एक थेंबही पाणी आलेले नाही.

यंदा धरण भरणार
यंदा पाऊस वेळेवर आल्याने जायकवाडी धरण यंदा भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी धरण २०११ मध्ये भरले होते. त्यानंतर गेल्या वर्षी धरणाचा साठा ४७ टक्क्यांवर आला होता. त्यावर सिंचनासाठी मराठवाड्यातील शेतीला दोन वेळा पाणी देण्यात आले. शिवाय हिरडपुरी-आपेगाव या बंधाऱ्यात तीन वेळा पाणी सोडले, तर परळी थर्मलला दोन वेळा पाणी सोडल्याने जायकवाडीचा पाणीसाठा पावसाळ्यापूर्वी १ टक्क्यावर आला होता.
बातम्या आणखी आहेत...