आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayant Patil News In Marathi, Divya Marathi, Skill Development Centre

आता अंबडला मिळणार 20 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड - भविष्यात कौशल्य विकासाला महत्त्व येणार आहे. त्यामुळे कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन युवकांनी नोकरी किंवा व्यवसाय करावा आणि बेरोजगारीवर मात करावी, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले. अंबड येथील महराष्‍ट्र कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या केंद्राच्या माध्यमातून अंबड येथे आता युवकांना 20 अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.

मंचावर बजाज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, प्रतापराव पवार, सिने अभिनेता मकरंद अनासपुरे, पालकमंत्री राजेश टोपे, निप्रो इंडियाचे मिलिंद पप्पू, आमदार चंद्रकांत दानवे, संतोष सांबरे, विक्रम काळे, जिल्हाधिकारी एस.एस. आर. नायक आदींची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, संपूर्ण महाराष्‍ट्रात असे केंद्र सुरू झाले तर सर्वांच्या हाताला काम मिळेल. मागासलेल्या जिल्ह्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्याचा समावेश होतो. त्यामुळे अशा जिल्ह्यात कौशल्य विकासाच्या अनेक गोष्टी आघाडी सरकारने केल्या आहेत. याठिकाणी सुरू करण्यात आलेले सर्वंच कोर्सेस दर्जेदार आहेत. महाराष्‍ट्रातील लोक घर सोडून बाहेर जाण्यास तयार होत नाही त्यामुळे प्रगती होत नाही. आपल्याकडे चांगले कौशल्य असेल तर ते दाखवण्यासाठी आपल्याला अनेक कंपन्या चांगला पगार देण्यास तयार आहेत. त्यासाठी घरापासून दूर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. भविष्यात कौशल्य विकासला महत्त्व येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे कोर्स करून नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करावा असे तेव्हाच देशाची प्रगती होईल, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, शेती आणि बांधकामावरही लवकरच प्रशिक्षण सुरू करू, असे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले.

या विषयांचे मिळणार प्रशिक्षण
या केंद्रात विविध प्रकारचे 20 अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. यात डायलेसीस टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह मेकॅनिक्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, सीएनसी प्रोगामिंग ऑपरेटर, टूल अँड डायमेकर, पेंट शॉप ऑपरेटर, फॉर्क लिफ्ट ऑपरेटर, मोबाइल रिपेअरिंग यासंदर्भात विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी
तीन महिन्यांचा असेल.