आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामनगरजवळील अपघातात 1 ठार; 8 जखमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामनगर - भरधाव व्हॅन उभ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात एक ठार, आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे 4 वाजता जालना तालुक्यातील रामनगर परिसरात घडली. जखमींना उपचारासाठी औरंगाबाद, जालना येथे हलवण्यात आले आहे.
हैदराबाद येथील सुब्रमण्यम सुब्बराव मुद्रगड्डा (रा. पोथल शेशमनगर, ता. तंगटूर, जि. प्रकाशम) हे आपल्या कुटुंबासह साई दर्शनासाठी शिर्डीकडे व्हॅनने जात असताना रविवारी सकाळी रामनगर ते कारखाना दरम्यान, दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच 31 - 5863) पाठीमागून टाटा विंगर व्हॅनने (एपी 27-टीव्ही 5808) जोराची धडक दिल्याने अपघात झाला. यात श्रीनिवास हनुमंतराव मुद्रगड्डा (24, रा. पोथल शेशमनगर) याचा घटनास्थळी मृत्यू झाला.
चालक प्रकाश राव यांच्यासह सुब्रमण्यम सुब्बराव मुद्रगड्डा, सुब्बतरण मुद्रगड्डा, मुरलीकृष्ण मुद्रगड्डा, एम. सिंगया मुद्रगड्डा, शेशवरुण मुद्रगड्डा, सुब्बरावन्ना मुद्रगड्डा, अमिना कोहम्मा मुद्रगड्डा, सुनीता सिंगया मुद्रगड्डा, व्यंकटेश पी. सुब्बराव, नारायन्ना कोयम्मा मुद्रगड्डा, राजेश सिंगया मुद्रगड्डा, दिव्या सिंगया मुद्रगड्डा यांना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले.