आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेक करताना जीप दुचाकीवर धडकली; अपघातात सहा जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर- ओव्हरटेक करताना भरधाव जीप मागून दुचाकीवर धडकली. हा अपघात सोमवारी धारूर-आसरडोह मार्गावर घडला. अपघातानंतर जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटल्याने सहा जण जखमी झाले. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर अाहे.

धारूर-आसरडोह मार्गावर सोमवारी सकाळी अकरा वाजता दुचाकी (एमएच २३ ३३२६) धारूरकडे येत असताना याच वेळी मागून जीप (एमएच २३ ३९२४) येत होती. दुचाकीला ओव्हरटेक करून जीप पुढे जात असताना जीपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीसह जीप नळी पुलावरून खाली पडली. या अपघातात दुचाकीस्वार सचिन सुभाष राठोड (१८, रा. गोपाळपूर, ता. धारूर), जीपमधील प्रवासी नंदुबाई हनुमंत तिडके (३६), प्रमोद राजाभाऊ तिडके (१६), सरूबाई दत्तू तिडके (६०), सुरेखा उत्रेश्वर मुंडे (२१),सगुणा दत्तात्रय मैंद (३५, रा. पिंपरवाडा) हे जखमी झाले आहेत.