आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंतुरात दुसऱ्या दिवशीही रास्ता रोको, दगडफेकीनंतर लाठीमार, येलदरीचे पडसाद, पोलिस अधिकारी कांबळेंची बदली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- येलदरी येथे ध्वजास धक्का लागल्यावरून महाराज मंडळींना झालेल्या मारहाणीनंतर शुक्रवारी रात्रीपासून जिंतूर शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. शुक्रवारी रात्री दगडफेक, जाळपोळीच्या प्रकारानंतर शनिवारी (दि. सात) दुसऱ्या दिवशीही या घटनेचे पडसाद उमटले. संतप्त जमावाने अण्णाभाऊ साठे चौकात दगडफेक करून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, या प्रकारात उपविभागीय  पोलिस अधिकारी अनिल कांबळे यांची पोलिस प्रशासनाने तडकाफडकी बदली केली आहे.
    
येलदरी येथे शुक्रवारी रस्त्यावरील एका समाजाच्या ध्वजाला वाहनाचा धक्का लागून ध्वज खाली पडला होता. त्या वाहनातून प्रवास करणाऱ्या महाराजांना संबंधित समाजाच्या तरुणांनी बेदम मारहाण करून त्यांना अपमानित केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद जिंतुरात पाहायला मिळाले.
 
 
बातम्या आणखी आहेत...