आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूमधील देशविरोधी कारवाया कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - भारतीय संस्कृती, परंपरा व येथील विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा संबंध न ठेवणाऱ्या कम्युनिस्टांनी १९९० पासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सातत्याने देशविरोधी कारवाया सुरू ठेवण्यासाठी पाठिंबा दिला आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम विभागीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांनी रविवारी येथे केला.
अभाविपच्या वतीने यूथ अगेन्स्ट अन्टी नॅशनलिस्ट या कार्यक्रमांतर्गत येथील बी.रघुनाथ सभागृहात जाणून घेऊया जेएनयूची सत्यता या विषयावर पाचपोर यांच्या व्याख्यानाचे आयोजन रविवारी केले होते. त्याप्रसंगी बोलताना पाचपोर यांनी जेएनयू व हैदराबादमधील रोहित येमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकारावर माहिती दिली. मंचावर खा. संजय जाधव, विद्यार्थी परिषदेचे प्रा.ज्ञानोबा मुंडे, शहरमंत्री रामेश्वर सावळे यांची उपस्थिती होती.
पाचपोर म्हणाले, जेएनयू व रोहित येमुला प्रकरणांतून देशात दूषित वातावरण निर्माण करण्याचे काम कम्युनिस्टांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कम्युनिस्टांना कधीही जवळ केले नाही, परंतु त्यांच्याच नावाखाली संघटनेने परिषदेविरोधात वातावरण केले. नक्षलवादांचा सत्कार, दुर्गामातेविरोधातील प्रकार, याकुब मेननला श्रद्धांजली असे देशविरोधी प्रकार जेएनयूमध्ये आज नव्हे तर १९९० पासून घडत आले, परंतु तेथील विद्यापीठ प्रशासनाने आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. कारण या सर्व प्रकारांना तेथील कम्युनिस्ट असलेल्या प्राध्यापकांचे बॅकिंग आहे. त्यांचा येथील विचारधारा, संस्कृती वा परंपरेशी कुठलाही संबंध नाही. ही गुंडागँग देशद्रोही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविघातक घाणेरडे प्रकार कम्युनिस्टांनी तेथे करत केवळ संघ परिवाराला झोडपण्याचेच काम केले आहे. डॉ. बाबासाहेबांचे संविधान उद््ध्वस्त करण्याचे काम करताना बाबासाहेबांच्याच नावाची ढाल केली जात आहे, असे पाचपोर म्हणाले.