आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरत हिवराळे यांना \'तंटामुक्त गाव पत्रकारिता पुरस्कार\' घोषित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दैनिक "दिव्य मराठी'चे उपसंपादक भरत सूर्यभान हिवराळे (रा. बोरगाव, ता. पैठण) यांना राज्य शासनाच्या वतीने वर्ष २०१३-१४ मध्ये देण्यात येणारा "महात्मा गांधी तंटामुक्त गाव पत्रकारिता पुरस्कार' १ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे आहे. तंंटामुक्त गाव मोहीम प्रभावी व यशस्वीरीत्या राबवण्यामध्ये पूरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वर्ष २०१३-१४ मध्ये वस्तुनिष्ठ प्रसिद्धी दिली. त्याबद्दल जिल्ह्यास्तरीय प्रथम पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याअगोदर भरत हिवराळे यांना ग्रामविकास विभागाअंतर्गत बचत गटाच्या उन्नती व कार्यास प्रसिद्धी दिल्याबद्दल वर्ष २०१०-११ मध्ये "राजमाता जिजाऊ स्वावलंबन पत्रकारिता पुरस्कार' तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना येथे देऊन गौरवण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...