आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाेन्नतीच्या मुद्द्यावरून फाेनवरून धमकी; पत्रकार दिलीप झगडेंना शिवीगाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- माझ्या भावाची बातमी का छापली व सीईअाेंकडे का तक्रार केली, याचा राग मनात धरून गुरुवारी बहुजन विकास माेर्चाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बाबूराव पाेटभरे यांनी येथील पत्रकार दिलीप झगडे यांना माेबाइलवरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

झगडे यांच्या तक्रारीवरून शहर पाेलिसांत पाेटभरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गुरुवारी सकाळी अाठ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी अचानक गट शिक्षणाधिकारी कार्यालयास भेट दिली. पत्रकारांनी त्यांना भेटून प्रवेश फी, विनापरवाना शाळा, रद्द केलेल्या पदाेन्नत्यांबाबत चर्चा केली. दरम्यान, साडेनऊ वाजेच्या दरम्यान पत्रकार झगडे यांना माेबाइल क्रमांक ९३७१३३६८६८ वरून बाबूराव पाेटभरे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.
पत्रकारांकडून घटनेचा निषेध
याप्रकरणी माजलगाव येथील सर्व पत्रकारांनी बैठक घेऊन घटनेबाबत बाबूराव पोटभरे यांनी केलेल्या वर्तनाचा व दिलेल्या धमकीचा जाहीर निषेध केला. या वेळी उमेश मोगरेकर, तुकाराम येवले, सुधीर नागापुरे, पुरुषोत्तम करावा, सुभाष नाकलगावकर, कमलेश जाब्रस, दिनकर शिंदे, राज गायकवाड, महेश होके, हरीश यादव, अनिकेत भिलेगावकर, पांडुरंग उगले, रत्नाकर शिंदे, दत्ता येवले, महेंद्र मस्के आदी उपस्थित होते.